चालू घडामोडी - २४ ऑगस्ट २०२०

कृषीक्षेत्रात बहरानंतरही अर्थव्यवस्था आक्रसणार

  • सरकारने सकल राष्ट्रीय उत्पादनाचे (जीडीपी) तिमाही अंदाज वर्तवण्यास १९९६-९७ मध्ये सुरुवात केल्यापासून प्रथमच देशाच्या अर्थव्यवस्थेत गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल ते जून या तिमाहीत वाढ नकारात्मक नोंदविण्यात येणार आहे. कृषी उत्पादनात वाढ होऊनही अर्थव्यवस्था आक्रसणार आहे.
  • राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे (नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस) ३१ ऑगस्ट रोजी आकडेवारी जाहीर केली जाईल. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात यापूर्वी १९७९-८०मध्ये उणे ५.२ टक्के इतकी वार्षिक घट नोंदवण्यात आली होती. मात्र त्यावर्षी कृषी क्षेत्राच्या ‘जीडीपी’तही १२.८ टक्के इतकी ‘उणे वाढ’ (निगेटिव्ह ग्रोथ) नोंदली गेली होती.

दाऊदबाबत पाकिस्तानचे घुमजाव

  • पाकिस्तानने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्येच असल्याचे कबुल केले होते . अखेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाचा दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांच्या यादीमध्ये पाकिस्तानने समावेश केल्याचे वृत्त काल सगळ्याच माध्यमांमध्ये झळकले होते.