चालू घडामोडी २४ ऑगस्ट २०२०

Spread the knowledge

कृषीक्षेत्रात बहरानंतरही अर्थव्यवस्था आक्रसणार

 • सरकारने सकल राष्ट्रीय उत्पादनाचे (जीडीपी) तिमाही अंदाज वर्तवण्यास १९९६-९७ मध्ये सुरुवात केल्यापासून प्रथमच देशाच्या अर्थव्यवस्थेत गेल्या वर्षीच्या तुलनेत एप्रिल ते जून या तिमाहीत वाढ नकारात्मक नोंदविण्यात येणार आहे. कृषी उत्पादनात वाढ होऊनही अर्थव्यवस्था आक्रसणार आहे.
 • राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयातर्फे (नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस) ३१ ऑगस्ट रोजी आकडेवारी जाहीर केली जाईल. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात यापूर्वी १९७९-८०मध्ये उणे ५.२ टक्के इतकी वार्षिक घट नोंदवण्यात आली होती. मात्र त्यावर्षी कृषी क्षेत्राच्या ‘जीडीपी’तही १२.८ टक्के इतकी ‘उणे वाढ’ (निगेटिव्ह ग्रोथ) नोंदली गेली होती.
 • यापूर्वी १९७२-७३ साली ०.३ टक्के, १९६५-६६ साली ३.७ टक्के आणि १९५७-५८ साली १.२ टक्के अशी अर्थव्यवस्था आक्रसली होती. त्यात कृषी उत्पादनातील घसरणीचा अनुक्रमे ५ टक्के, ११ टक्के आणि ४.५ टक्के वाटा होता.
 • २०२०-२१ च्या पहिल्या तिमाही (एप्रिल-जून) त्यास अपवाद ठरू शकते. चालू आर्थिक वर्षांत अर्थव्यवस्थेत घसरण होणार असल्याचे भाकित बहुतेक गुंतवणूक बँका आणि पतमानांकन संस्थांनी वर्तवले असतानाच, रिझव्‍‌र्ह बँकेच्या ताज्या सर्वेक्षणात उणे ५.८ टक्क्य़ांचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 • विशेषत: टाळेबंदीमुळे उत्पादनातील अडथळ्यांची झळ सोसाव्या लागलेल्या पहिल्या तिमाहीत अनेक निर्देशकांच्या आधारे फार मोठय़ा प्रमाणावर नकारात्मक वाढ (डी- ग्रोथ) होणार असल्याची अपेक्षा आहे. यात औद्योगिक उत्पादन निर्देशांक (एप्रिल-जून २०१९ च्या तुलनेत एप्रिल-जून २०२० मध्ये ३५.९ टक्क्य़ांनी कमी), व्यावसायिक वाहनांची विक्री (उणे ८४.८ टक्के) आणि मोठय़ा बंदरांवरील मालवाहतूक (उणे १९.७ टक्के) यांचा समावेश आहे.
 • ’गेल्या वर्षीच्या तुलनेत कृषी उत्पादन क्षेत्रात वाढ होणार आहे. पहिल्या तिमाहीतील कृषी ‘जीडीपी’त एप्रिल-जूनमधील कापणीने संपणाऱ्या रब्बी हंगामातील उत्पादनाचा समावेश आहे.
 • ’गहू, चणा आणि इतर रब्बी धान्यांचे यंदाचे उत्पादन १५१.७२ दशलक्ष मेट्रिक टन इतके, म्हणजे गेल्यावर्षीपेक्षा ५.६ टक्के अधिक होणार असल्याचा अंदाज कृषी मंत्रालयाने वर्तवला आहे.
 • ’याचवेळी, तेलबियांचे उत्पादन (प्रामुख्याने मोहरी) ३.२ टक्क्य़ांनी कमी होऊन १०.४९ टक्के होणार आहे; तर कांदा, टोमॅटो, भोपळा, घेवडा आणि जिरा यांपासून ते आंबा, द्राक्षे व टरबूज या बहुतांश फळबाग पिकांनी वाढ नोंदवली आहे. केवळ बटाटा त्यास अपवाद ठरला आहे.

दाऊदबाबत पाकिस्तानचे घुमजाव

 • पाकिस्तानने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानमध्येच असल्याचे कबुल केले होते . अखेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाचा दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांच्या यादीमध्ये पाकिस्तानने समावेश केल्याचे वृत्त काल सगळ्याच माध्यमांमध्ये झळकले होते.
 • आता त्याच वक्तव्यावरुन पाकिस्तानने २४ तासांत घूमजाव केले आहे. दाऊद इब्राहिम कराचीत असल्याचा दावा पाकिस्तानने फेटाळून लावला आहे. दाऊदबद्दल माध्यमांनी प्रसिद्ध केलेले वृत्त निराधार असल्याचे सांगत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने दाऊद कराचीत असल्याचा दावा नाकारला आहे.
 • आतापर्यंत अनेक वर्ष दाऊद आमच्या देशात नसल्याचा दावा करण्याऱ्या पाकिस्तानला अखेर दाऊद इब्राहिम आमच्या देशातच असल्याचे मान्य करावे लागले आहे. पाकिस्तानने ही कारवाई फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या ब्लॅक लिस्टमध्ये जाण्यापासून स्वत:ला वाचवण्यासाठी केल्याचे दाखवले आहे. कराची क्लिफ्टन, सौदी मशिदीजवळ व्हाइट हाऊस असा दाऊदचा पत्ता पाकिस्तान सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत दिला आहे. 88 दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांवर पाकिस्तानने निर्बंधांची कारवाई केली आहे. त्यात दाऊदच्या नावाचा समावेश आहे.
 • कराचीमध्ये दाऊद असल्याच्या अधिसूचनेनंतर हे वृत्त सर्वच माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. दाऊदच्या कराचीमधील वास्तव्याच्या माहितीवरून अडचणीत आलेल्या पाकिस्तानने दाऊद कराची राहत नसल्याचे म्हटले आहे. माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तावर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, दाऊद पाकिस्तानात नाही.

Leave a Reply